


आमच्याविषयी
आम्ही ‘मंजिरी प्रॉपर्टीज’ धाराशिव (उस्मानाबाद) शहरातील एक अग्रगण्य बांधकाम व्यवसायिक व रिअल इस्टेट विकासक आहोत.
धाराशिव (उस्मानाबाद) शहराच्या बांधकाम क्षेत्रामध्ये उच्चतम दर्जा, कौशल्यपूर्ण विकसन, नावीन्यपूर्ण प्रकल्प, दर्जेदार आणि विश्वसनीय ग्राहक सेवा, पारदर्शक व्यवहार्यता या अंगभूत गुणांच्या जोरावर आम्ही यशाची शिखरे पादाक्रांत करत आहोत.
‘मंजिरी प्रॉपर्टीज’ हे धाराशिवकरांच्या पसंतीस उतरलेले आणि लोकांनी दर्जेदार बांधकामासाठी नावाजलेले नाव असून आमच्या प्रगतीचा आलेख ग्राहकांच्या विश्वास व आशीर्वादामुळे उत्तरोत्तर उंचावत आहे.
शहरामध्ये गुणवत्तापूर्ण बांधकाम आणि दर्जा मध्ये कधीही तडजोड ना करणे किंबहुना ग्राहकाच्या अपेक्षेपेक्षा वरचढ कामगिरी करून त्यांना सुखद धक्का देणे आम्हास आवडते.
आज रोजी निर्धारित वेळेत किंवा वेळेपूर्वी घरांचा ताबा देणारे तसेच बुकिंग करतेवेळी लेखी स्वरूपात फिटमेंट व अमेनिटीज चार्ट हे अलॉटमेंट लेटर सोबत देणारे आणि तंतोतंत पालन करून त्यानुसार सर्व सुखसोयी प्रदान करणारे आम्ही एकमेव बांधकाम व्यावसायिक आहोत हे आम्ही अभिमानाने सांगतो.
आम्हास एकदा आपल्या सेवेची संधी द्या… कारण आम्ही विश्वास बांधतो..!!
आमची दूरदृष्टी
बांधकाम सेवा क्षेत्रामध्ये धाराशिव शहर व परिसरात अत्युच्च गुणवत्ता व मूल्याधिष्ठित व्यवसायाद्वारे ग्राहकांना समाधान व अलौकिक आनंदाची अनुभूती देणे व त्याद्वारे ग्राहकाच्या पहिल्या पसंतीची बांधकाम व्यवसाय कंपनी असा ब्रँड बनणे.
आमचे ध्येय
- “आम्ही विश्वास बांधतो” या आमच्या एकमेव ब्रीदवाक्याने प्रेरित अग्रणीची बांधकाम व्यवसायिक संस्था म्हणून नावारूपास येणे.
- धाराशिव शहरामध्ये अतिशय दर्जेदार बांधकाम उत्पादन व सेवा अत्यंत माफक दरात ग्राहकांना त्यांच्या हक्काची वास्तू प्रदान करणे.
- ग्राहकांना हवाहवासा वाटणारा व आपला बनवणारा तसेच ग्राहकांसोबत चिरंतन काळासाठी बांधकाम व रियल इस्टेट क्षेत्रातील विश्वासू भागीदार म्हणून उदयास येणे.
- सर्वसामान्य ग्राहकांना त्यांच्या हक्काच्या वास्तूचे क्लिअर टायटल मालमत्ता उपभोग अधिकार व अचूक कायदेशीर नोंदणीकृत दस्तावेजाद्वारे मालकी हक्क मिळवून देणे.
आमची मूल्ये
1. गुणवत्ता
2. पारदर्शकता
3. वचनबद्धता
4. विश्वासार्हता
5. सचोटी व नीतिमत्ता
6. प्रामाणिकपणा
7. कठोर परिश्रम
8. उद्यमशीलता
आमचे प्रकल्प